एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी श्री बालाजी महाराजांना साकडे

पारोळा लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकनाथ शिंदे हे पुन्हा एकादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी पारोळा येथील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी आज सकाळी ९ वाजता पारोळा तालुक्याचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज यांना महाआरती करत साकडे घालण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख अमृत चौधरी, भागवत चौधरी, नगरसेवक राजूभाऊ कासार, कैलास पाटील, पंकज मराठे, साहेबराव पाटील, बजरंग दलाचे विनोद खाडे, राकेश भोसले, अनिल चौधरी, योगेश पाटील, मयूर भोई, योगेश चौधरी यांच्यासह शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content