मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ‘जय महाराष्ट्र’ असे म्हटल्याने त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याचे मानले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील मोठा गट असल्याची माहिती समोर आली आहे. यता शिवसेनेतील तब्बल ३५ आमदार असून ते आज अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजपच्य ा नेत्यांनी दिली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे तथापि, पत्रकार परिषद घेण्याआधीच त्यांनी ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी जय महाराष्ट्र असे म्हटले आहे. यामुळे आता ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याचे मानले जात आहे. विशेष करून शिवसेनेने बोलणी सुरू केली असतांनाच हे ट्विट करण्यात आल्याची बाब विशेष मानली जात आहे.