पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौर्यावर जात असून यात त्यांच्या हस्ते त्यांच्याच नावाने असणार्या उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम याला प्रखर विरोध झाल्याने अखेर रद्द करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौर्यावर जात आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे त्यांच्या हस्ते एकनाथ शिंदे उद्यानाचे उदघाटन होणार होते. मात्र या कार्यक्रमाची माहिती समोर येताच याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला.

पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक तथा शिंदे यांचे समर्थक नाना भानगिरे यांनी या हडपसर भागात उभारण्यात आलेल्या उद्यानाच्या उदघाटनाचे आयोजन केले होते. खर तर या गार्डनला एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याला अनेकांनी आक्षेप घेतला होता. सोशल मीडियात याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यामुळे अखेर आज एकनाथ शिंदे उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनातर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.



