Home क्राईम एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये अटक

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये अटक


पुणे-प्रतिनिधी l आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी करताना पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील खराडी भागात एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी तेथे छापा टाकला. यात पाच पुरुष आणि दोन महिला अशा सात जणांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अद्याप तरी पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली नसली तरी खेवलकर यांना अटक करण्यात आलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार एकनाथराव खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद रंगले आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच आता थेट खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound