Home Cities जळगाव एकनाथ खडसे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वरणगावमध्ये तीव्र निषेध

एकनाथ खडसे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वरणगावमध्ये तीव्र निषेध


वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  वरणगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ हा आंदोलनाचा उपक्रम राबविण्यात आला. या निषेध आंदोलनात विविध भाजप पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत कडाडून टीका केली आणि खडसेंच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.

वरणगाव शहरात पार पडलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले. त्यांच्यासोबत शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, ज्येष्ठ नेते सुभाषदादा महाजन, योगेश महाजन, नानाभाऊ चौधरी, मिलिंद भैसे, आकाश निमकर, मयूर शेळके, अजमल खान भाई यांनीही आपली उपस्थिती नोंदवली.

या निषेध आंदोलनात जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. ए. जी. जंजाळे यांनी एकनाथ खडसे यांच्या विधानाचा संविधानिक दृष्टिकोनातून समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, महिला आयोगाची अध्यक्ष असलेल्या रूपाली चाकणकर यांच्याविषयी असे अशोभनीय वक्तव्य करणे अत्यंत खेदजनक आहे. हे वक्तव्य केवळ महिलांचा अपमान करणारे नसून ते समाजात चुकीचा संदेश देणारे आहे.

तसेच बळीराम सोनवणे, नामदेवदादा सोनवणे, अरुण बावणे, शेख निजाम, शेख अलीम, साबीर कुरेशी, डॉ. सादिक शेख, रामभाऊ माळी, निवृत्ती माळी, हितेश चौधरी, कृष्णा महाजन, भोजराज पालवे, श्रीराम पालवे, तुकाराम कोळी, श्रेयस वंजारी, एकनाथ धुंदे, दत्तात्रय सूर्यवंशी, विवेक शिवरामे यांचाही या आंदोलनात सक्रीय सहभाग होता.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला. आंदोलनादरम्यान “खडसे माफी मागा”, “महिलांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. सर्वच कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल खुली माफी मागण्याची मागणी केली.

या आंदोलनात सहभागी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने सांगितले की, महिला सन्मानासाठी कोणतेही अपमानास्पद विधान खपवून घेतले जाणार नाही. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर आक्षेपार्ह वक्तव्य करणं अयोग्य आहे, असं मतही त्यांनी मांडलं.


Protected Content

Play sound