मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे उद्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी ३० डिसेंबर रोजी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होते. मात्र याच्याच आदल्या दिवशी खडसेंना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले.
दरम्यान, खडसे आता कोरोनातून बरे झाले असून ते उद्या म्हणजेच १५ जानेवारी रोजी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.