जळगाव प्रतिनिधी । जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवरी भारतीय जनता पक्षाला अपेक्षित विजय मिळणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी आज दिली.
जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपला विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमिवर, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप केला. ते म्हणाले की, भाजपला दणदणीत विजय मिळाला असून जळगाव व रावेरमध्ये अपेक्षित विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विकासाचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.
पहा : नेमके काय म्हणाले एकनाथराव खडसे.