ठाणे (वृत्तसंस्था) कुणी कुणाला भेटावे यावर बंदी नाही. एकनाथ खडसे सर्वांचे मित्र आहेत. शिवसेना-भाजपची युती असताना त्यांनी अनेक नेत्यांसोबत एकत्र काम केले आहे. गेल्या अनेक वर्षाचे स्नेहसंबध आहेत. त्यामुळे या भेटींचा वेगळा अर्थ काढू नये, असे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी सध्या चर्चेचा विषय आहे. एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र राजकारणात कुणीही कुणालाही भेटू शकते. लोकशाहीत कुणीही कुठेही जाऊ शकतो. कुणी कुणाला भेटावे याचा सर्वांना अधिकार आहे, असे शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.