Home Cities यावल उमेश फेगडे यांच्या वाढदिवसाला ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम

उमेश फेगडे यांच्या वाढदिवसाला ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध वृक्षरोपणाचे कार्यक्रम पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित घेण्यात आला .

भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष व यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक व खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश रेवा फेगडे यांच्या वाढ दिवसा निमित्ताने यावल खरेदी विक्री सहकारी सोसायटीच्या परिसरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन पर्यावरण व संवर्धनाचा संदेश देण्यासाठी संपुर्ण देशात साकारण्यात येत असलेल्या एक पेड माँ के नाम या कार्यक्रमा अंतर्गत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली .

यावल येथे खरेदी विक्री संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या स्वागत सत्काराच्या कार्यक्रमा प्रसंगी उमेश फेगडे यांचा विविध पदाधिकाऱ्यांनी स्वागत सत्कार केले या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी,भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे, समाजसेवी संस्था आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, भाजपाच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे , यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन तेजस पाटील,योगेश चौधरी ,बबलु घारू,भुषण फेगडे,खरेदी विक्री संघाचे संचालक अतुल भालेराव, भाजयुवा मोर्चाचे सागर कोळी, भाजपाचे शहराध्यक्ष राहुल बारी, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्त किशोर कुलकर्णी,अनिल डांबरे,कोमल इंगळे , व्यकंटेश बारी , पुंडलीक बारी , पि.एस. सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .


Protected Content

Play sound