रावेर प्रतिनिधी । अक्षयतृतीयानिमित्ताने आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रोडवरील रसोई हॉटेलचे मागे केळीचे बागात आडोशाला जुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळील २ लाख २ हजार ६९० रुपये रोख व जुगाराची साधने जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, (1) पंकज नामदेव महाजन वय 32 राहणार डेली भाजी मार्केट रावेर तालुका रावेर (2) विकी प्रताप पाटील वय 28 राहणार अग्रेसन भवन रावेर तालुका रावेर (3) हर्षल अरुण बेलस्कर वय 28 राहणार नागझिरी रोड रावेर तालुका रावेर (4) पूर्वेश गणेश महाजन वय 22 राहणार महात्मा फुले चौक रावेर तालुका रावेर (5) संतोष शांताराम चौधरी वय 45 राहणार अफुगल्ली गल्ली रावेर तालुका रावेर (6) सुरज मोतीलाल भोई वय 22 राहणार भोईवाडा रावेर तालुका रावेर (7) अतुल पुनमचंद परदेशी वय 25 राहणार स्वामी विवेकानंद चौक रावेर तालुका रावेर (8) भूषण दिलीप सोनार वय 30 राहणार विद्यानगर रावेर तालुका रावेर असे आरोपींचे नावे आहेत.
स्वतःच्या फायद्यासाठी नन्ना मन्ना नावाचे माग पत्ता जुगारावर पैसे लावून पत्ता जुगाराचा खेळ खेळताना खेळविताना पत्ता जुगाराची साधने, रोख रुपये व वाहनासह मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध मुंबई जुगार ऍक्ट कलम 12 (अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा खबरी अहवाल वरिष्ठांना कळविण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे सो. यांच्या आदेशान्वये पोना 2867 महेंद्र शांताराम सुरवाडे नेमणूक रावेर पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आला आहे.
यावेळी त्यांच्या ताब्यातील एकूण 500/- रुपये रोख घोळात पडलेले व 22 पत्ते, (2) एकूण रोख रुपये 4,690/- रुपये. (3) 170,000/- रुपये किमतीच्या मोटर सायकल. (4) 27,000/- रुपये किमतीचे मोबाईल. एकूण 2,02,690/- रुपये रोख व 52 पत्त्याचा कॅट जप्त करण्यात आला आहे.