चोपडा प्रतिनिधी । महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आठ दिवसीय स्वयंसिद्धा अभियानाचे’ आयोजन करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, युवती सभेअंतर्गत दि.२४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान स्वयंसिद्धा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्युडो कराटे व मार्शल आर्ट याबद्दलचे प्रशिक्षण आत्माराम बाविस्कर यांनी 60 विद्यार्थींनीना दिले. आज या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. अश्विनी सैदाणे व कु. अश्विनी साळुंखे या विद्यार्थींनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर आठ दिवसात घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक मुलींनी आत्माराम बाविस्कर व कु. राहुल निकुंब यांच्या मदतीने एका पथनाट्याद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिंनी आणि शिक्षक-शिक्षकेतर यांच्या समोर सादर केले. ज्यात बसमध्ये प्रवास करताना गर्दीच कारण दाखवून छेड काढणाऱ्या मुलांना कसा धडा शिकवावा, एखाद्या व्यक्तीला दुर्बल समजून त्याकडून ऐवज लांबवनाऱ्या चोराला कसे मारावे तसेच शिकत असताना गुंड प्रवृत्तीच्या मुलांना घाबरून न जाता त्यांची मुलीना त्रास देण्याची खोड कशी मोडावी अशा घडण्या-या घटनाचे प्रात्यक्षिकातून अतिशय प्रभावीपणे दाखवून दिले. उपस्थित मान्यवरांनी त्या मुलींचे कौतुक केले व त्यांना प्रोस्ताहन दिले. त्यानंतर कु. वृषाली पाटील हिने आठ दिवसात आपल्याला मिळालेले प्रशिक्षण अतिशय प्रभावी होते. आता त्या स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ झाल्या असल्याचे नमूद करून युवतीसभा प्रमुख डॉ.पी.एम. रावतोळे यांचे यशस्वी आयोजना बद्दल आभार मानले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील (माजी आमदार व म.गां.शि.मंडळ, संस्थापक अध्यक्ष) हे होते. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आशा पाटील (म.गां.शि.मंडळ, उपाध्यक्षा), डॉ. स्मिता पाटील(म.गां.शि.मंडळ, सचिव), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए.एल चौधरी, प्रा.डॉ.के.एन सोनवणे व प्रा.एन.एस.कोल्हे, प्रा.व्ही.पी.हौसे (विद्यार्थि विकास अधिकारी), प्रा.एम.टी.शिंदे आदी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.वैशाली जोशी व आभार प्रदर्शन कु. प्रियांका धनगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रांती क्षीरसागर, डॉ.एच.जी.चौधरी, एस.बी.पाटील, संगीता पाटील, कु.स्नेहा राजपूत, पूजा पुन्नासे, किरण शेलार, पूनम महाजन, रवी पाटील, सुधाकर बाविस्कर, प्रताप पाटील, प्रदीप बाविस्कर व हनुमंत पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.