भुसावळ प्रतिनधी |शहरात एका गणेश मंडळाच्या स्टेज मागे काही तरुण झन्नामन्ना खेळत असल्याची गुप्त माहिती भुसावळ बाजार पेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन शाहनिशा केली असता ८ तरुणांना जुगाराच्या साहीत्यासह अटक करूनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, रविवार ८ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सिंधी काँलनी भागात नवजीवन सोसायटी मधील एस.एस.गृप मंडळाचे स्टेजच्या मागे काही व्यक्ती झन्नामन्ना नावाचा पत्त्यांचा खेळ खेळत आहे अशी गुप्त बातमी मिळाल्याने उप.पो.अधिकारी गजानन राठोड, भुसावळ बाजार पेठ पोलीस स्थानकाचे पो.निरीक्षक दिलीप भागवत मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. शंकर पाटील, पो.काँ. बंटी कापडणे, कृष्णा देशमुख, करतारसिंग परदेशी, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने लागलीच तेथे जावुन त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जय जगदीश कुमार पुंजानी (वय-१९), रमेश नारायण चग्गु (वय-२१वर्ष ), अखिल सुनिल कुमार कारडा (वय-२० वर्ष), किशोर लक्ष्मणदास कारडा (वय-२२ वर्ष), रोहीत हरीषकुमार बठेजा (वय-१९ वर्ष), अविनाश चंद्रलाल कारडा (वय-२० वर्ष), कैलास किशोरचंद आठवाणी (वय-१९वर्ष), मनिष राजेश चावराई (वय-१९ वर्ष, सर्व रा. नवजीवन सोसायटी सिंधी काँलनी भुसावळ) या ८ जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ ४ हजार ३५० रुपये रोख व ५२ पत्याचा कँट व जुगाराची साधन मिळाली. यामुळे या सर्व जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.हे.काँ शंकर पाटील करीत आहे.