Home Cities यावल यावल येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात

यावल येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात

0
23
yaval eid milan

yaval eid milan

यावल प्रतिनिधी । येथे काँग्रेस पक्षातर्फे नुकतेच ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन शहरातील सुदर्शन चौकात करण्यात आले.

या ईद मिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष दादा चौधरी होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना हिंदू आणी मुस्लिम समाज बांधवांचे पवित्र रमजान महिन्यातील पवित्र बंधनात आणि राष्ट्रीय एकात्मतेचे हे प्रतीक म्हणून यावल मध्ये या कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यास मोठया संख्येने आपली उपास्थिती दाखवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आयोजकांच्या वतीने शीरखुर्मा आणि फराळाची व्यवस्था सर्वासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

या कार्यक्रमास पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हा इंटकचे अध्यक्ष भगतसिंग पाटील ,माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष व नगरसेवक मुकेश येवले, काँग्रेसचे पुंडलिक बारी, नगरसेवक मनोहर सोनवणे, शेख असलम शेख नबी, गुलाम रसूल हाजी अकील सेठ, मुस्तफाखान सुभान खान, हाजी गफार शहा यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाला मारुळ फैजपुर भुसावळ सह तालुक्यातील काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अनिल जंजाळे, अमोल भिरुड, अल्ताफ शेख, तन्वीर शेख, इमरान पहिलवान, नईम शेख अलीम शेख अझहर शेख रहमान खाटीक विवेक सोनार, जलील पटेल, जाकीर कुरेशी,जहिर कुरेशी यांनी सहकार्य केले. सुत्र संचालन हबीब मंझर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष कबीर खान यांनी मानले. याप्रसंगी आपल्या देशात सुख शांती व राष्ट्रीय एकात्मते साठी आणी यंदा चांगला पाऊस पडावे याकरीता प्रार्थना करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound