यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादर्भाव पाहाता (दि.३०) रोजी साजरी करण्यात होणारी ‘ईद-ए-मिलादुलनबी’ सण अत्यंत साधापणाने साजरी करण्यात येणार असून मिरवणुक रद्द करण्यात आलीय. तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी केले आहे.
ही बैठक मुस्लीम समाजाच्या धर्मगुरू, विविध सामाजीक संस्थांचे पदाधिकारी आणि मस्जिदचे मौलाना यांच्या उपस्थिती झाली. दरम्यान आज (दिनांक २८ ऑक्टोबर) रोजी ४वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या प्रमुख उपस्थित (दि.३० ऑक्टोबर) रोजी साजरे होणाऱ्या पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने साजरी होणाऱ्या सण ईद ए मिलादुलनबीची मिरवणुक (जुलुस) यंदा कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महामारीचे धोके व प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने खबरदारीचे उपाय म्हणुन दरवर्षी यावल शहरातील मुस्लीम समाज बाधवांच्या वतीने काढण्यात येणारी भव्य मिरवणुक यंदा रद्द करण्यात आली आहे . राज्य शासनाने लागु केलेल्या लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या मार्गदर्शनपर माहीती देण्यासाठी यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी बैठकी आयोजीत केली होती. बैठकीस हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, हाजी ईकबाल खान नसीर खान, कॉग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष कदीर खान यांच्यासह आदी मुस्लीम समाजातील सामाजीक कार्यकर्ते उपस्थित होते.