सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आयशर टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर धडक होवून दोन्ही चालकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. लोणंद – सातारा मार्गावरील अंबवडे चौकानजीक सोमवारी पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने ट्रक जळून खाक झाला. अल्ताफ मन्सुरी, आणि महेश दयानंद घुगे अशी मृत ट्रक आणि टेम्पो चालकांची नावे आहेत. अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. त्यामुळे चालकाचा केबीनमध्येच जळून मृत्यू झाला. टेम्पो चालक गंभीररित्या जखमी झाला होता. पोलिसांनी त्याला सातारा शासकीय रुग्णालयात दाखल केला असताना त्यांचाही सकाळी मृत्यू झाला.
दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तसेच ट्रकने पेट घेतल्याने ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ट्रक चालकाचा केबीनमध्येच जळून मृत्यू झाला. पहाटे झालेल्या अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक बंबाला घटनास्थळी बोलवण्यात आले. या अपघातात ट्रकमधील मांगीलाल रामप्रसाद भिल्ल आणि टेम्पोतील उदय आबाजी पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा आणि अन्य कायदेशीर कार्यवाही करत आहेत.