Home Cities भुसावळ फेकरीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप  

फेकरीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप  


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव महा समितीच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे ११ वे वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या समितीने यंदाच्या शिवजयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला.

समितीच्या वतीने फेकरी गावातील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष आदित्य कृष्णा पाटील, उपाध्यक्ष अतुल मुकुंदा पाटील, सचिव कमलेश भास्कर बऱ्हाटे, सहसचिव आकाश राजेंद्र बोरोले तसेच सल्लागार गजानन हरी पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या मंगलमय प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी सचिन पाटील, ग्रामपंचायत शिपाई नसीर शहा, मराठी शिक्षक चंद्रकांत सदाशिव सूर्यवंशी, मराठी शिक्षिका प्रियंका अशोक कांबळे तसेच उर्दू शिक्षक शेख आरिफ समद यांची विशेष उपस्थिती होती. शिक्षकांनी समितीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

यावेळी अमोल टेकाडे, गणेश भारंबे, वैजनाथ कुलकर्णी, चेतन तायडे, हर्षल निकम, कुणाल पाटील, उदय बऱ्हाटे, चेतन सोनवणे, संकेत झाल्टे, प्रेम भटकर आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Protected Content

Play sound