मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत ईडीच्या कोठडीत असतांनाच आज याच प्रकरणी मुंबईत दोन ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यातच आज मंडळवारी ईडीने याच प्रकरणाशी संबंधीत दोन ठिकाणी चौकशी केली आहे.
आज ईडीच्या पथकाने मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. यातील एक हे नॅशनल हेरॉल्डच्या कार्यालयावर असून याच प्रकरणात सोनिया आणि राहूल गांधी यांची आधीच चौकशी करण्यात आली आहे. तर दुसरा छापा हा संजय राऊत यांच्या पत्रा चाळशी संंबधीत असल्याची माहितू सूत्रांनी दिली आहे.