जोधपूर वृत्तसंस्था । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे मोठे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या घरावर आज ईडीच्या पथकाने छापा मारला. विशेष बाब म्हणजे ईडीचे अधिकारी पीपीई किट घालून आले असून त्यांनी कसून तपासणी सुरू केली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे बंधू अग्रसेन गेहलोत याच्या निवासस्थानी आज सकाळी ईडीची अधिकारी पीपीई किट घालून पोहचले. चमू सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अग्रसेन गेहलोत यांच्या येथील मंडोर पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या घरी पोहोचला. अग्रसेन गेहलोत यांच्या मंडोर येथील घराशिवाय त्यांचे पाटवा येथील कार्यालय आणि दुकानावरही तपास सुरू केला आहे.
अनुपम कृषि फर्टिलायझर नावाने पावटा येथे अग्रसेन गहलोत यांचे कार्यालय आणि दुकान आहे. हे कार्यालय आणि दुकान पूर्वीपासून आहे. इथेच गेहलोत यांचे निवडणूक प्रचार कार्यालय असून येथूनच मुख्यमंत्री गेहलोतांचे निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे चालतात.