औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेचे नुकसान झालेय. या माणसाने शरद पवारांच्या नादी लागून पक्ष धुळीस मिळविला असून आज त्यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने प्रत्येक शिवसैनिक खुश होणार !” अशा शब्दांमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर राऊत यांना अटक होणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
पत्रा चाळ प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी धडक देऊन त्यांची चौकशी सुरू करताच याच्या विविध राजकीय पक्षांतर्फे प्रतिक्रिया येण्यास प्रारंभ झाला आहे. शिंदे गटाचे शिलेदार आमदार संजय शिरसाठ यांनी या प्रकरणी अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना संजय शिरसाठ म्हणाले की, आज ईडीचे दहा अधिकारी राऊत यांच्या घरी गेले असून त्यांना अटक देखील होऊ शकते. राऊत यांनी ज्या प्रकारे शिवसेनेला नुकसान केले, ते पाहता राज्यातील प्रत्येक शिवसैनिक आज खुश असेल असे ते म्हणाले. याच माणसाने शरद पवार यांच्या नादी लागून शिवसेनेला धुळीस मिळविण्याचे काम केले असून त्यांनी जे केले ते आता भोगावे लागणार असल्याचा इशारा संजय शिरसाठ यांनी याप्रसंगी दिला. जसे केले तसेच भोगावे लागणार असल्याचे शिरसाठ म्हणाले.