मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी रावेर लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी खडसे कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळाल्याने त्यांचा प्रचार न करण्याचा निर्धार केल्याचा घोषणा देत तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. शेवटी जिल्हाप्रमुख पाटील यांनी शिवसैनिकांची मनधरणी केली व तुमच्या या भावना पक्षप्रमुखांना पोहोचवेल असे आश्वासन त्यांना दिले.
या आंदोलनप्रसंगी उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, जामनेर पाटील मुन्ना पाटील, यावल अल्प जिल्हा संघटक अफसर खान, उपजिल्हा संघटक रवींद्र पवार, रावेर विलास मुळे, भुसावळ असलम शेख, बोदवड तालुकाप्रमुख छोटू भोई, मुक्ताईनगर समाधान महाजन, भुसावळ योगीराज पाटील, रावेर विजय साठे, मलकापूर रविंद्र सोनवणे, यावल गजानन खोडके, बोदवड युवा सेना जिल्हाधिकारी अविनाश पाटील, उपजिल्हाधिकारी पवन सोनवणे, सरचिटणीस सुरत परदेसी, महिला आघाडी जिल्हा संघटक पूनम बराटे, कल्पना पालवे, शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन, भुसावळ बबलू बराटे, भुसावळ रवींद्र सुतार, वरणगाव राकेश घोरपडे, रावेर सुनील पाटील, गोपाळ सोनवणे, गणेश ठोंगे, राजेंद्र हिवराळे, पंकज कोळी, शकूर जमदार, जाफर अली, हारुण मेंबर, बिस्मिल्ला भाई, मुक्तार खान, संतोष सोनवणे, अशोक शिंदे, आप्पा चौधरी, अमोल निंबाळे, महिला आघाडी भुसावळ संघटिका भूराबाई चव्हाण, उपशहर संघटिका भारती गोसावी, प्रतिभा दुसाने, रचना गोसावी, हिराबाई पाटील, लक्ष्मी खरे, सुनंदा विरघट, शोभा कानोजी, ज्योती मराठे, शोभा भोई, पल्लवी नारखेडे, दुर्गा कोळी, छाया खरात, पूजा गिरणारे, मंगला ठाकूर, अनिता पवार, रजनी साठे, ज्योती भारंबे, मुक्ताईनगर शहर संघटिका सरिता कोळी, यशोदा माळी, विद्या भालशंकर, ज्योती मालचे, शारदा भोई, आदींसह रावेर लोकसभा मतदार संघातील असंख्य शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
पहा : शिवसैनिक नेमके काय म्हणाले ते !