मुक्ताईनगर- खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी असलेले मध्यप्रदेश पोलीसांचे तपासणी नाके शेवटी हलविण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशाच्या सीमा बंद करण्यासाठी अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी मध्यप्रदेश पोलीसांनी सीमा तपासणी नाके उभारले होते. या नाक्यावर कर्त्यव्यास असलेल्या पोलीसांमुळे अंतुर्ली परीसरातील नागरिकांना मुक्ताईनगर, जळगाव, आदी ठिकाणी जाण्यासाठी कमालीचा त्रास होता. या तपासणी नाक्यावरुन रुग्णांच्या वाहनाला ही जाऊ न दिल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या .अंतुर्ली शिवाराची सुमारे पाचशे एकर शेत जमीन या भागात असल्याने शेतकरी,मजुर वर्ग,केळी माल पाहण्यासाठी जाणार्या केळी व्यापारी,मुक्ताईनगर येथे शासकीय कामा साठी जाणार्या नागरीकांना तपासणी नाक्याव…