लोणी खु. येथे जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामात गैरप्रकार चौकशीसाठी लोकप्रतिनिधींना निवेदन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील ग्रा.पं. मौजे लोणी खु.येथे जलजीवन मिशन अंतगर्त झालेल्या कामामध्ये गावातील ग्रा.पं. सदस्य कौतिक माधवराव पाटील त्यांच्या पत्नी रंजना कौतिक पाटील (पोलीस पाटील) यांनी योजनेंतर्गत झालेल्या पाईपलाईन सोबत खाजगी पाईपलाईन करून योजनेंतर्गत झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी वरून खाजगी शेत मिळकतीत व शेत तळ्यात पाणी पुरवठा केलेला आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यापासून सदर सरकारी विहिरी वरून सबंधित लोक त्यांच्या खाजगी क्षेत्रात पाणी पुरवठा करीत आहेत. सदर बाबतीत गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी संबधित अधिकारी अभियंता धिरज पाटील व तत्कालिन सरपंच प्रमोद आनंदा पाटील, ग्रा.पं. सदस्य कौतिक माधवराव पाटील यांना तोंडी तक्रार देऊन व ग्रामस्थांकडे असलेले व्हिडीओ व फोटो दाखवून देखील त्याविषयी कमालीचे दुर्लक्ष केलेले असे दिसून येत आहे.

संबंधित काम हे प्रगती प्रथावर असतांना सदर कामासाठी काही महिन्यांचा कालावधी लागला होता. त्यावेळेस देखील कौतिक माधवराव पाटील यांनी योजनेच्या पाईपलाईन सोबत स्वताची खाजगी पाईपलाईन केलेली असतांना किंवा करत असतांना संबंधित अभियंता व उपअभियंता यांच्या हि बाब लक्षात आणून दिली तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीची कुठलीही दखल न घेता त्याकडे दुर्लक्ष केले आहे ते काम तसेच चालू ठेवलेसंबंधित अधिकारी यांनी वेळीच त्यावर निर्बंध लागून योग्य ती कार्यवाही करणे का गरजेचे समजले नाही जर संबंधितः, बाब सदर अधिकारी यांच्या निदर्शनास आली नसेल तर त्या कामाबाबत लाईन आउट देणे संबंधित कामाची गुणवत्ता व निरीक्षण केले गेले का नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. सबब सदर अर्जाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना विचारावयाचे आहे की सदर योजनेच्या इस्टीमेट मध्ये किंवा नियमांमध्ये योजनेच्या पाईपलाईन सोबत खाजगी पाईपलाईन करण्यास व योजनेंतर्गत झालेल्या विहिरी वरून खाजगी क्षेत्रात किंवा शेततळ्यास पाणी पुरवठा करणे समाविष्ट आहे का तसे असल्यास योग्य त्या परवानग्या तसेच योग्य व आवश्यक ती कागदपत्रे आम्हास पुरविण्यात यावी तसेच त्याबाबत असे कोणतेही निर्देश किंवा परवानगी नसल्यास आपण त्याबाबत योग्य ती कार्यवाही का केलेली नाही आणि करणार आहेत किंवा नाही.

सदर दुष्काळात गावातील लोक व जनावरे यांना पाणी पुरवठा होत नसुन खाजगी क्षेत्रात पाणी पुरवठा करणे तेही सरकारी पाणी पुरवठा विहिरी वरून योग्य आहे काय ? तरी महोदय आपणास विनंती की, सदर अभियंता धिरज पाटील, तत्कालिन सरपंच प्रमोद आनंदा पाटील, ग्रा.पं. सदस्य कौतिक माधवराव पाटील तसेच पोलीस पाटील रंजना कौतिक पाटील यांनी संगन मताने पदाचा गैरवापर केलेला आहे तरी याबाबत सखोल चौकशी करूनं तसा जवाब द्यावा व संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले असून निवेदनावर रवींद्र दामू पाटील, योगेश भागवत पाटिल, रविंद्र निळकंठ पाटील, रोशन रविंद्र पाटील, प्रल्हाद निळकंठ पाटील, रावसाहेब अशोक ठाकरे यांच्या सह्या आहेत. सदर घटनास्थळी दिनांक 19 रोजी अविनाश रमेश पवार, हर्षल मधुकर पाटील हे दोन ज्युनिअर इंजिनियर पाहणी करून खोदकाम करून दोन पाईप आढळून आल्याने फोटो काढून घेऊन गेले आहेत तरी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

सदर निवेदनाच्या ना. गुलाबराव पाटील सो. पालकमंत्री, जळगाव व ग्रा.पा.पु. मंत्री महा., ना. गिरीशभाऊ महाजन जलसंपदा मंत्री, चिमणराव पाटील आमदार, स्मिताताई वाघ खासदार, मुख्य कार्यकारी अधिकारो जिल्हा परिषद, जळगाव, गटविकास अधिकारी पं. समिती, पारोळा, ना. तहसीलदार तहसील कार्यालय, पारोळा यांना सदर निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत. तात्काळ कारवाई न झाल्यास येत्या आठ दिवसात लोणी मार्गावर रास्ता रोकोआहे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Protected Content