Home Cities भुसावळ गुरूनाथ फाऊंडेशनतर्फे भुसावळात उद्या निबंध स्पर्धा

गुरूनाथ फाऊंडेशनतर्फे भुसावळात उद्या निबंध स्पर्धा


स्पर्धा

भुसावळ प्रतिनिधी। गुरुनाथ फाउंडेशन मुक्ताईनगर आयोजित निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ उद्या शनिवार 16 मार्च 2019 रोजी सकाळी 11 वाजता येथील नहाटा महाविद्यालयात येथे आयोजित करण्यात आला आहे.

यांची राहणार उपस्थिती
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी.पी.पाटील, नगराध्यक्ष रमण भोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी भुसावळ शहरातील भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound