सातारा जिल्ह्यास भूकंपाचा हादरा

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सातारा जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून यात कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही.

महाराष्ट्रातील सातारा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. सोमवारी रात्री ११.३६ वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील सातारा जिल्हा होता. सातारा येथे रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. सोमवारी रात्री ११.३६ वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील सातारा जिल्हा होता. रिऍक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी होती. कमी तीव्रतेमुळे कोठेही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाची खोली पाच किलोमीटर इतकी होती. राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, हा भूकंप १७.२७ अक्षांश आणि ७३.७५ रेखांशावर जाणवला.

याआधी रविवारी देशाची राजधानी नवी दिल्लीसह आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रविवारी संध्याकाळी ४.०८ वाजता गाझियाबाद, नोएडासह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.१ इतकी असल्याचे राष्ट्रीय भूकंप केंद्राने नोंदवले आहे. त्याची खोली दहा किलोमीटर होती. त्याचे केंद्र फरीदाबादच्या पूर्वेस नऊ किलोमीटर अंतरावर होते.

Protected Content