सातारा । सातारा परिसराला सकाळी भूकंपाचा हादरा बसल्याने नागरिक भयभीत झाले. मात्र सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील काही भागांना आज सकाळी ७.४८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे अनेक ठिकाणी लोक घाबरून घरातून रस्त्यांवर धावत आले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ४.८ इतकी असल्याचे दिसून आले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्त हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.