यावल येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सहात साजरी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी | शहरात आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात वातावरणात साजरी करण्यात आली.

 

यावल शहरात आज शनिवार दि. ९ ऑक्टोबर रोजी  कोळी समाजाचे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्ताने यावल नगर परिषद क्षेत्रातील रेणुकामाता मंदिरासमोर प्रतिमा पूजन व वाद्य वृंदाच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी महर्षी वाल्मीक यांचा भव्य मुर्तीची आकर्षक सजावट करुन रॅली काढण्यात आली. रेणुका माता मंदिराजवळ प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.  याप्रसंगी जळगावचे माजी उपमहापौर डॉ. आश्विन  सोनवणे, राहुल सोनवणे, माजी,जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे , वडोदा सरपंच संदीप सोनवणे, माजी नगरसेवक प्रा. मुकेश येवले, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी, काँग्रेस कमेटीचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल, मोहन कोळी, यांचेसह विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीची सांगता यावल शहरातील संभाजी पेठ मध्ये करण्यात आली.

या मिरवणुकीत महर्षि वाल्मीक मित्र मंडळ ,संभाजी पेठ मित्र मंडळ व महाराणा प्रताप मित्र मंडळासह समाज बांधव मोठ्या संख्येने   सहभागी झाले होते.

 

Protected Content