यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तहसील कार्यालयाच्या माध्यमातुन एमआरएसएसी आणि महाराष्ट्र राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतपिकांचे,जमिनीचे, जनावरांचे, घरांचे, गोठांचे झालेले नुकसानीचे शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ भरपाई मिळण्यासाठी ई – पंचनामा हे अत्यंत उपयोगी ॲप विकसित करण्यात आले आहे.
यासंदर्भात नाशिक विभागात ५ सप्टेंबर २०२४ रोजी विभागीय कार्यालय नाशिक य ठिकाणी विभागातील महसूल, ग्रामविकास, कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तद्नंतर दिनांक २० सप्टेंबर रोजी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया जळगाव येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने तहसील कार्यालय यावल या ठिकाणी सर्व तलाठी मंडळ अधिकारी ,नैसर्गिक आपत्ती क्लर्क यांना प्रशिक्षण देण्यात आले असून आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मा.तहसिलदार यावल श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी जिह्यात सर्वप्रथम ई – पंचनामा या पोर्टलवर तालुक्याचे युजर आयडी क्रिएट केला असून यामध्ये तालुक्यातील सर्व कार्यरत तलाठी यांचे युजर आयडी तयार करून घेतले आहे.या पुढे तालुक्यात नैसर्गिक आपत्ती च्या नुकसानीचे पंचनामे हे ई -पंचनामा या ॲप वरच होतील. असे यावलच्या तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे .