यावल( प्रतिनिधी)। येथे नुकताच संपन्न झालेला यावल तहसीलच्या प्रशासकीय नविन इमारतीचा ई-लोकापर्ण कार्यक्रम चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा गोंधळलेल्या कारभार आणी बांधकाम ठेकेदार यांच्यातील समन्वया अभावी या लोकापर्ण कार्यक्रम चर्चेला जात आहे. या सर्व गोंधळलेल्या वातावरणात आदी भाजपाचे पदाधिकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे.
दिलेल्या निवेदनातील महत्वाचे मुद्दे
या संदर्भात कॉंग्रेसचे पंचायत समितीचे विरोधी गटनेते शेखर सोपान पाटील व राष्ट्रवादीचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली दोघ पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभीयंता निंबाळकर व कार्यालयीन लिपीक वाघ यांना तक्रारीचे निवेदन देवुन प्रशासकीय ईमारतीच्या लोकापर्ण कार्यक्रमातुन विरोधी पक्षाला हेतुपुरसपर डावलण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. एकाच प्रशासकीय इमारतीचे दोन वेळा लोकापर्ण कसे करण्यात आले. असा जाब विचारला व अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी प्रशासकीय इमारतीचे लोकापर्ण कसे होवु शकते, जिल्हाचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील जर जळगावहुन ई-लोकापर्ण करणार होते तर मग यावल येथे मोठे पिंडाल टाकण्याची गरज काय होती, असा प्रश्न कार्यक्रमाच्या दिवशी भाजपाचे कार्यकर्त व आता विरोधी पक्षाचे कार्यकर्ते अधिकारी यांना विचारीत आहे. असे कार्यक्रम घडवुन आणणे हा एका प्रकारे जिल्हाच्या पालकमंत्री यांचा अपमान नाही का असा प्रश्न यावेळी उपासितांनी मांडला व प्रशासकीय कामकाजावर चांगलेच ताशेरे ओढले. यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची याची तात्काळ चौकशी करण्यात येवुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातुन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, काँग्रेसचे पं.स.चे विरोधी गटनेते शेखर सोपान पाटील, काँग्रेसचे रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख शेख अलीम मो. रफीक, कॉंग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, राष्ट्रवादीचे कामराज घारू, गणेश चोपडे, राजु पिंजारी, अमोल भिरूड, प्राविण घोडके, अशपाकशाह आदी पदाधिकारी व कार्यकर्त यावेळी आस्थित होते.