रावेर प्रतिनिधी । आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी आज तालुक्यातील संवेदनशील गावांना भेटी देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
रावेर (प्रतिनिधी) आगामी ग्राम पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर संवेदनशील गावांना उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी भेटी दिल्या यावेळी त्यांच्या सोबत पोलिस निरीक्षक रामदास वाकडे देखील उपस्थित होते. रावेर तालुक्यात होणाऱ्या ग्राम पंचयात निवडणूकी च्यापार्श्वभुमीवर रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संवेदनशील गावे रसलपूर,खिरोदा प्र रमजीपुर, बक्षीपुर, शिंदखेडा,मुंजलवाडी या गावांना उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी गावाच्या बुथला भेटी देऊन सुरक्षिततेचे दृष्टीने पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे देखील उपस्थित होते.