अमळनेर(प्रतिनिधी) नुतन पोलिस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.
अमळनेर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक रफिक शेख यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर नविन उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून राजेंद्र ससाणे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांनी मंगळवारी रात्री १०:०० वाजता आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. राजेंद्र ससाणे यांनी यापूर्वी पोलिस निरीक्षक म्हणून गडचिरोली,अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, निजामपूर, धुळे, अश्या ठिकाणी आपली दमदार सेवा बजावली आहे.
दरम्यान नाशिक येथे पोलिस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथून अमळनेर येथे पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. रफिक यांची कारकीर्द अत्यंत चांगली गेली. आता राजेंद्र ससाणे यांची कारकिर्दीचा अनुभव अमळनेरच्या जनतेला येईलच.