“कर्तव्य” – खेड्यापासून राजधानीपर्यंत मानवतेचा दीप उजळणारी चळवळ !

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “जिथं शब्द थांबतात, तिथं सेवा बोलते, जिथं आशा मावळते, तिथं कर्तव्य उजळतं!” – अशी साद घालणारी कर्तव्य मेडिकल फाउंडेशन ही संस्था आज महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत आपल्या सेवाभावाने परिचित झाली आहे. डॉ. फैज सय्यद आणि डॉ. नम्रता इंगळे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही चळवळ आज 300 हून अधिक डॉक्टर्स आणि 200 पेक्षा अधिक स्वयंसेवकांच्या सहभागाने विविध समाजोपयोगी उपक्रमांतून कार्यरत आहे.

कर्तव्य फाउंडेशन रस्त्यावरील बेघर, कुपोषित बालके, वृद्ध, अनाथ मुले, बालमजुरीतून मुक्त झालेले किशोर, वंचित महिला आणि ग्रामीण-आदिवासी समाजासाठी विविध सेवा राबवते. संस्था मोफत आरोग्य तपासण्या, औषध वितरण, लसीकरण, पोषण वाटप मोहीमा, कुपोषणविरोधी सत्रं, सुपोषण शिबिरे आणि मातांसाठी पोषण मार्गदर्शन असे उपक्रम नियमित राबवते.

ग्रामीण आणि निमशहरी भागांतील विद्यार्थ्यांसाठी संस्था “ध्येय आणि दिशा” मार्गदर्शन शिबिरं, स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक कोर्सेसबाबत माहिती देणारी सत्रं आणि करिअर सल्ला कार्यक्रम आयोजित करते. स्वस्थ मन, सुंदर जीवन उपक्रमांतर्गत व्यसनमुक्ती मोहिमा, समुपदेशन सत्रं आणि रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी आधार सेवा उपलब्ध करून दिली जाते.

प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी आत्मसन्मान व मासिक पाळी व्यवस्थापन सत्रं, मोफत सॅनिटरी पॅड वाटप, महिला आरोग्य शिबिरे आणि लघुउद्योग प्रशिक्षण यांद्वारे महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेत ‘संत मदर तेरेसा रयत राज्य गौरव पुरस्कार 2024’, ‘आरंभ गौरव पुरस्कार’, ‘माणुसकी राज्यगौरव पुरस्कार’ यांसह अनेक सन्मान संस्थेला प्राप्त झाले आहेत.

दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान मोफत आरोग्य सेवा पुरवून संस्थेने सर्वांचे लक्ष वेधले. डॉ. अमिषा सरवदे यांची महाराष्ट्र हॉकी संघासाठी ‘टीम डॉक्टर’ म्हणून निवड होणे ही संस्थेच्या गुणवत्तेची आणखी एक ठळक ओळख ठरली आहे.

संस्थेच्या नेतृत्वात डॉ. फैज सय्यद, डॉ. नम्रता इंगळे यांच्यासह डॉ. गौतमी कोकरे, डॉ. ऋतुजा शिंदे, डॉ. वैष्णवी कांबळे, डॉ. अमिषा सरवदे, डॉ. निरव मेहता, डॉ. सोहेल खान, डॉ. साहिल पटेल, डॉ. दीप बोरा, डॉ. फोरम रावणी, गौरव गायकवाड, आशुतोष खाडे, अनिकेत मोगरे, डॉ. ऋषिकेश पाटिल, डॉ. यश थोरात, पूर्वा तांबट यांचा समावेश आहे – जे सर्वजण निस्वार्थ भावनेने समाजपरिवर्तनासाठी कार्यरत आहेत.

डॉ. फैज सय्यद म्हणतात, “सेवेला जात-पात नाही, गरीब-श्रीमंत नाही. गरज आहे, ती माणूस म्हणून वागण्याची.”
डॉ. नम्रता इंगळे यांचा ठाम विश्वास आहे – “प्रत्येक मुलाला पोषण, प्रत्येक महिलेला सन्मान, आणि प्रत्येक गरजवंताला आधार – हेच आमचं ध्येय आहे.”

Protected Content