Home अर्थ सिंग आणि राजन यांच्या काळात बँकांची अवस्था होती बिकट – सीतारमन

सिंग आणि राजन यांच्या काळात बँकांची अवस्था होती बिकट – सीतारमन

0
134

nirmala sitaraman

मुंबई प्रतिनिधी । माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळात देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी खूप वाईट काळ अनुभवला आहे, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केलं आहे. प्रतिष्ठीत कोलंबिया विद्यापीठाच्या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या.

भारताच्या आर्थिक धोरणांसंबंधी दीपक अँड नीरा राज सेंटरने कोलंबिया विद्यापीठात सीतारामन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना नवीन आयुष्य देणे ही आजच्याघडीला माझी पहिली जबाबदारी आहे. रघुराम राजन प्रचंड हुशार असून त्यांच्याबद्दल मला आदर आहे. भारतीय अर्थव्यवस्था पूर्ण तेजीत असताना रघुराम राजन यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी निवड झाली होती. अलीकडेच रघुराम राजन यांनी ब्राऊन विद्यापीठात बोलताना नरेंद्र मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात आर्थिक आघाडीवर समाधानकारक कामगिरी केली नाही. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव होता असे म्हटले होते. तसेच सितारामन पुढे बोलतांना म्हणाल्या की, राजन यांच्या कार्यकाळात बँकांकडून झालेले कर्ज वाटप एक गंभीर विषय आहे. राजन आरबीआयचे गव्हर्नर असताना नेत्यांच्या एका फोन कॉलवर कर्ज मंजूर व्हायचे. आजही सार्वजनिक क्षेत्रातील बँका या दलदलीतून बाहेर येण्यासाठी सरकारवर अवलंबून आहेत असे सीतारमन म्हणाल्या.

मनमोहन सिंग आणि रघुराम राजन यांच्या कार्यकाळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची जितकी वाईट अवस्था होती. तितकी कधीच नव्हती. त्यावेळी आपल्या सर्वांना याबद्दल काहीच माहित नव्हते असे सीतारमन म्हणाल्या. भारतात सध्या मंदीसदृश्य स्थिती आहे. औद्योगिक उत्पादनासह सर्वच आघाडयांवरुन निराशाजनत बातम्या येत आहेत. रघुराम राजन यांनी वारंवार मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे. भारतात वाहन उद्योग क्षेत्राला सध्या सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे.


Protected Content

Play sound