वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले; यावल पोलीसांची कारवाई

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विनापरवाना डंपरमध्यून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर यावल पोलीसांनी कारवाई केली असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील वाघळूद गावाच्या फाट्याजवळून विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने रविवारी २ जून रोजी मध्यरात्री २ वाजता कारवाई करत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर क्रमांक (एमपी ०९ जीएफ ९२८१) पकडला. दरम्यान चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी वाळूने भरलेले डंपर जप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक विकास बापू सोनवणे वय-२३ रा. कानडदा ता. जि. जळगाव यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण हे करीत आहे.

Protected Content