डंपरची एस.टी.बसला धडक : चालकासह दोन विद्यार्थिनी जखमी

jamner accident

जामनेर, प्रतिनिधी | वाळूने भरलेल्या भरधाव वेगात असलेल्या डंपर व एस.टी. बसची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात चालकासह दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज (दि.२९) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील केकतनिंभोरा गावाजवळ घडली. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, जामनेर आगाराचे चालक विशाल अभिमान गाभे (रा.कोदोली) हे प्रवाशांनी भरलेली बस घेवून (क्रमांक एम.एच.१४, बी.टी.१३३७) दुपारी जामनेरहून जळगावकडे निघाले असता नेरीकडून जामनेरकडे वाळूने भरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (क्रमांक एम.एच.१९, वाय.२३१३) एस.टी.बसला चालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे डंपर रस्त्याच्या खाली उतरले. अपघात होताच दारू प्यालेला डंपरचालक समोरून येणाऱ्या डंपरमध्ये बसून फरार झाला तर जखमी बसचालक विशाल अभिमान गाबे यांच्यासह शालेय विद्यार्थिनी प्रियंका सुनिल पाटील व अनुजा संभाजी चौधरी दोघी रा.केकतनिंभोरा यांना उपचारासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघा विद्यार्थिनींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील व महामंडळाचे अधिकारी प्रकाश वाघ, दिलीप मराठे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. आगारप्रमुख के.एम. धनराळे यांनी रुग्णालयात येऊन जखमीची विचारपुस केली. महामंडळातर्फे जखमींना तातडीची मदत म्हणून एक-एक हजार रुपये रोख देण्यात आलेले आहेत. बसचे वाहक संजय धोंडू बंडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात डंपर चालकाविरुद्ध येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Protected Content