जळगाव, प्रतिनिधी | येथील काँग्रेस नेते आणि माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कारला आज (दि.१६) सकाळी नशिराबाद येथे एका मद्यधुंद डम्पर चालकाने धडक दिली. यावेळी वाहनचालक सतीश उभाळे त्यांची कार चालवत होता तर त्यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील बसल्या होत्या. या अपघातातून ते दोघे थोडक्यात बचावले आहेत.
या धडकेत त्यांच्या फोर्च्युनर गाडीच्या मागील भागाचे बरेच नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नशिराबाद पोलिसांनी वाळूने भरलेले डम्पर (एम.एच.०४ सी.पी.९३९८) ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही करण्याबाबत महसूल विभागाला सूचना देण्यात आली आहे. हे डम्पर सुखदेव सपकाळे यांच्या नावावर असल्याचे कळते.