जळगाव प्रतिनिधी । भरधाव डंपरने बसला दिलेल्या धडकेत चार प्रवासी जखमी झाले असून डंपर चालकाने मात्र घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना आज सकाळी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील खोटेनगर स्टॉपजवळ राष्ट्रीय महामार्गावर एमएच-१४ बीटी३२८० क्रमांकाच्या बसला आज सकाळी भरधाव वेगात जाणार्या डंपरने समोरून धडक दिली. यामुळे बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून चार प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, डंपर चालकाने मात्र घटनास्थळावरून पळ काढला आहे. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंतच पोलीसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.