जळगाव, प्रतिनिधी | घरकुल घोटाळ्यातील आरोपी असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची तब्येत आज (दि.२२) अचानक बिघडल्याने त्यांना मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलवण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सुरेशदादा जैन यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने त्यांना नाशिक कारागृहात ठेवण्यात आले आहे. आज कारागृहात असताना त्याची प्रकुती दुपारी अचानक बिघडल्याने त्यांना मुंंबई येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची शुगर वाढल्याने ते बेशुद्ध पडले होते. त्यांना उच्च रक्तदाब, छातीत वेदनेचा त्रास जाणवत होता. त्यांना पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.