चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील बँक ऑफ इंडियाच्या हिरापूर रोडवरील सुखसागर हॉटेल समोरील एटीएमला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. आग लागताच एटीएम रूममध्ये धूर कोंडला गेला होता. दरम्यान, वेळीच न.पा.चे अग्निशमन दलाचे जवान यांनी आग विझवल्याने मोठी हानी टळली.
चाळीसगावात एटीएमला शॉर्टसर्किटमुळे आग
6 years ago
No Comments