मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे दिसून आले आहे.
मुक्ताईनगर शहरा आणि परिसरात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे आज सकाळपासून शहरात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांची धांदल उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. बस स्थानकावर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तर, पावसामुळे अनेक बसेस विलंबाने धावत असल्याने एकूणच विद्यार्थ्यांची कुचंबणा झाल्याचे दिसून आले आहे.
उद्या रविवार असल्याने विद्यार्थ्यांना अडचण येणार नसली तरी शनिवारी विद्यार्थ्यांची धांदल उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने अलीकडेच यावल आणि रावेर येथे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमिवर शाळांना सुटी दिल्याचे निर्देश जारी केले होते. यानुसार, प्रशासनाने संततधार पाऊस सुरू असेल तर या प्रकारचे निर्देश देण्याची गरज आहे. अन्यथा, विद्यार्थ्यांचे किती हाल होतात हे आज दिसून आले आहे.