Home क्राईम अतिमद्य सेवनामुळे जळगावच्या तरुणाचा मृत्यू

अतिमद्य सेवनामुळे जळगावच्या तरुणाचा मृत्यू


suside
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शनिपेठ परिसरातील एका 35 वर्षीय तरुणाचा अतिमद्य सेवनामुळे जिल्हा रुग्णालयात आज (रविवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन उर्फ पिंटू देवचंद पाटील (रा. चौघुले प्लॉट, शनीपेठ) हा भाड्याच्या घरात एकटाच राहतो. त्याला अनेक वर्षांपासून दारू पिण्याचे व्यसन होते. शनिवारी 8 जून रोजी सकाळी 9 वाजता नळाला पाणी आल्याने शेजारी राहणारे महिलांनी पाणी भरण्यासाठी दरवाजा ठोकला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने आत गेले असता नितीन अत्यवस्थ अवस्थेत मिळून आला. शेजारच्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. आज (रविवार) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान नितीनचा मृत्यू झाला. याबाबत शनिपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील प्राथमिक तपास गणेश गव्हाळे करीत आहे. दरम्यान, नीतीनला आई किंवा वडील कोणीच नाहीय. भाऊ असून तो देखील कायम बाहेर राहतो,असे कळते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound