दारूच्या नशेत तरूणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील आभोणे गावात काहीही एक कारण नसतांना एका तरूणाला दारूच्या नशेत येवून हातातील लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी १३ डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १५ डिसेंबर रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान उर्फ सोनू नंदू पाटील वय ३२ रा. आभोणे ता.चाळीसगाव हा शनिवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील भिलाटी वस्तीत कामानिमित्त आलेला होता. त्यावेळी काहीही कारण नसतांना संशयित आरोपी भाऊसाहेब सिताराम पाटील, ज्ञानेश्वर भाऊसाहेब पाटील, भूषण भाऊसाहेब पाटील आणि अलकाबाई भाऊसाहेब पाटील यांनी दारूच्या नशेत येवून समाधान पाटील याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लोखंडी पाईप टोक्यात टाकून गंभीर जखमी केले. तसेच गावात दिसला तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी समाधान याने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात मारहाण करणारे भाऊसाहेब सिताराम पाटील, ज्ञानेश्वर भाऊसाहेब पाटील, भूषण भाऊसाहेब पाटील आणि अलकाबाई भाऊसाहेब पाटील सर्व राहणार आभोणे ता. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विश्वास देशमुख हे करीत आहे.