Home क्राईम दारूच्या नशेत पोलीस ठाण्यातच गोंधळ; सार्वजनिक शांतता भंगाचा गुन्हा दाखल

दारूच्या नशेत पोलीस ठाण्यातच गोंधळ; सार्वजनिक शांतता भंगाचा गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत येऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात बुधवारी, २३ जुलै रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश भरत गिर गोसावी (वय ४२, रा. जामनेर) हा ५ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता दारूच्या नशेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आला. तेथे त्याने आपली पत्नी सोनल गोसावी आणि वहिनी वनिता गोसावी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मोठमोठ्याने आरडाओरड करत सार्वजनिक शांततेचा भंग केला.

या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगदीश गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः पोलीस ठाण्यात अशाप्रकारे गोंधळ घालणे हे कायद्याने गुन्हा असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे.


Protected Content

Play sound