जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांभोरी पुलावरून दारू पिऊन बस चालवित असतांना पुलावर बस चालकाचा नियंत्रण पूर्णपणे जर सुटले असले तर मोठी दुर्घटना झाली असती. ही घटना सोमवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दारू पिऊन बस चालविणाऱ्या बस चालक आनंदा माळी याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, जळगावहून बाभूळगाव येथे मुक्कामी जाणाऱ्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता. बांभोरी पुलावर त्याचे बसवरील नियंत्रण सुटत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा करायला सुरुवात करून थोड्या अंतरावर बस थांबवायला चालकाला भाग पाडले. पुलावर बस चालकाचा नियंत्रण पूर्णपणे जर सुटले असले तर मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच विभाग नियंत्रक भगवान जगनोर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, चालक आनंदा माळी हा दारू पिऊन बस चालवत असल्याचे प्राथमिक दृष्ट्या आढळले आहे. त्याच्यावर आज तात्काळ निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती देखील भगवान जगनोर यांनी दिली.