काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुन्हा पानाचे गावातील एका तरूणाला काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत रस्त्यावरील दगड फेकून मारल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. याप्रकरणी रात्री ८ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक वृत्त असे की, कृष्णा कडू पारधी वय २६ रा. कुऱ्हा पानाचे ता.भुसावळ हा तरूण सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या घराजवळ असतांना संशयित आरोपी खुशाल जगन कोळी रा. कुऱ्हा पानाचे ता.भुसावळ याने दारूच्या नशेत आला. त्यावेळी काहीही कारण नसतांना कृष्णा पारधी याला शिवीगाळ करत रस्त्यावरील दगड फेकून मारल्याने गंभीर दुखापत केली. याप्रकरणी कृष्णा पारधी याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी खुशाल जगन कोळी रा. कुऱ्हा पानाचे ता.भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार युनूस मुसा शेख हे करीत आहे.

Protected Content