कोट्यावधी रूपये खर्च करून पेयजल योजना अपुर्णावस्थेत

water1

यावल( प्रतिनिधी)। तालुक्यातील विविध ठिकाणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातुन सातत्याने ओढवणाऱ्या पाण्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी मागील २००७ पासुन केंद्रीय राष्ट्रीय पेयजल योजनेव्दारे कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून देखील पेयजल योजनांचे काम अद्याप अपुर्णावस्थेत असल्याने यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

यावल तालुका हा आदीवासी व अतिदुर्गम भाग म्हणुन ओळखला जातो. या परिसराला गेल्या पंधरा वर्षापासुन कमी जास्त प्रमाणात होणाऱ्या पाऊसाचा फटका बसत असुन, परिसरातील विहीरींची जलस्तर कमालीचा खालावला असल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या तालुक्यात सातत्याने कमी होणारे पर्यजन्यमान लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने दखल घेवुन ग्रामीण जनतेचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी २००७ पासुन जळगाव जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाध्या माध्यमातुन यावल तालुक्यातील हंबडी गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ८ लक्ष ४५ हजार, पिंपरूड गावा साठी २० लक्ष ९० हजार, राजोरा गावासाठी ८२ लक्ष ८५ हजार, सावखेडा सिम गावासाठी ४५ लक्ष ८४ हजार, कासवा ग्रामपंचायती करीता ४५ लक्ष ९० हजार, व आडगाव या ग्रामपंचायती करीता ४९ लक्ष ८९ हजार रुपयाचे निधी, असे मिळुन ३ कोटीच्या वर निधी दिला असुन, तो खर्च देखील करण्यात आला. असे असतांना मात्र तरी देखील अद्यापही संपुर्ण कामे गेल्या दहा वर्षापासुन अपुर्ण अवस्थेत कशी आहे. याची चौकशी होवुन तात्काळ ही प्रलंबीत जलकुंभाची कामे पुर्णत्वाकडे न गेल्यास या सर्व गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तात्काळ दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे.

Add Comment

Protected Content