डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयात ‘मुलगी वाचवा’ थीमवर चित्रकला स्पर्धा

जळगाव प्रतिनिधी । ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे.. तीच सुरवात आहे आणि सुरवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.. अशा आशयाचे चित्र रेखाटत डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे जागतिक कन्या दिवस साजरा करण्यात आला.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात ११ ऑक्टोबर ह्या जागतिक कन्या दिनानिमित्‍त मुलगी वाचवा या थीमवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.निखील पाटील, डॉ.अमित जैस्वाल, डॉ.सुवर्णा सपकाळे, डॉ.प्रज्ञा महाजन, डॉ.अनुराग मेहता, डॉ.साकीब सईद आदि उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश वारके, भारती चौधरी, गौरव काळे, इशांत चौधरी, निलेश नगपगारे आदिंनी सहकार्य केले.

स्पर्धेचा निकाल चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रृती गंधारी, द्वितीय जागृती चौधरी आणि तृतीय क्रमांक सिद्धी सनके हिने पटकाविला.

 

Protected Content