Home धर्म-समाज भुसावळात नाल्यांचे पाणी रस्त्यावर : नपाच्या सफाईबाबत प्रश्नचिन्ह (व्हिडीओ)

भुसावळात नाल्यांचे पाणी रस्त्यावर : नपाच्या सफाईबाबत प्रश्नचिन्ह (व्हिडीओ)


bhusaval drenege

भुसावळ, प्रतिनिधी | येथे गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील अनेक भागात नाले तुंबल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले आहे. नाले सफाईचे टेंडर काढून नाले स्वच्छ केल्याचा नगरपालिकेचा दावा त्यामुळे फोल ठरला आहे.

 

येथील नगरपालिकेने टेंडर काढून जेसीबीच्या माध्यमातून नालेसफाई केल्याचा दावा केला असला तरी केवळ एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. शहरातील आगाखान बाडा, जाम मोहल्ला परिसरातील नाला गेल्या अनेक वर्षांपासून सफाईपासून वंचित आहे. काल झालेल्या एक तास मुसळधार पावसाने या नाल्याला पूर आला असून नाल्यातील घाण पाणी घरामध्ये जाऊ नये, याकरिता येथील नागरिकांनी स्वतः नाल्यातील वाहून आलेला कचरा बाजूला करत नाल्याच्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. यामुळे पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याविषयी किती तत्पर आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 


Protected Content

Play sound