भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुलमध्ये संसदेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विदयार्थ्यांच्या सादरीकरणाने युवा संसदच जणू अवतरली. मुलांमध्ये घटनेविषयी तसेच संसदेच्या कामकाजाविषयी माहिती असावी या हेतूने शाळेतील विद्यार्थ्यासाठी युवा संसद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील मॅडम उपस्थित होते. सत्ताधारी व विपक्षामध्ये वादामूळे तसेच मुलांचे कुशल नेतृत्व तसेच उत्कृष्ट भाषाशैली यामुळे युवा संसदेचे कामकाजातून जणू संसदच अवतरल्याचा भास होत होता. डॉ. उल्हास पाटील , डॉक्टर वर्षा पाटील तसेच मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील मॅडम यांनी कार्यक्रमातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले.