Home Cities जळगाव प्रभाग क्रमांक-16 मधून डॉ. विरन खडके यांची बिनविरोध निवड !

प्रभाग क्रमांक-16 मधून डॉ. विरन खडके यांची बिनविरोध निवड !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रभाग क्रमांक 16-अ मधून भारतीय जनता पक्षाचे डॉ. विरन खडके यांची बिनविरोध निवड झाली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार एकामागून एक बिनविरोध होत असतांना आज प्रभाग क्रमांक 16-अ मधून भाजपचे उमेदवार डॉ. विरन खडके यांची बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.

डॉ. खडके यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे त्यांची निवड निश्चीत झाली आहे. त्यांची निवड जाहीर होताच परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला. तर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी आपण प्रभागात आधीच कामे केली असून उर्वरित कामांचा अनुशेष भरून काढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.


Protected Content

Play sound