चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद कोतकर यांनी आज आपल्या समर्थकांसह तहसील कार्यालयात प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे.
डॉ. कोतकर हे गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात सामाजिक व आरोग्य क्षेत्रात काम करत असून तालुक्यात जल व्यवस्थापन तसेच हागणदारी मुक्तीसाठीही त्यांनी कार्य केले आहे. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चुरस निर्माण होणार आहे.